Home / राजकीय / भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार झाल्या ! भाजपाचा आरोप

भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार झाल्या ! भाजपाचा आरोप

Sonia Gandhi

नवी दिल्ली – लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (MP Rahul Gandhi)निवडणूक आयोगावर हल्लाबोल करीत असताना आता भाजपाने काँग्रेसवर पलटवार करत, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)या भारतीय नागरिक (Indian citizen)होण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीररित्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला. ही ४२ वर्षांपूर्वीची बाब आहे.

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (BJP IT cell chief Amit Malviya,)एक्स पोस्ट करीत म्हणाले की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत नोंदवले गेले. त्या दोन्हीवेळी त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. कदाचित याच कारणामुळे राहुल गांधीही अपात्र (legitimizing ineligible)किंवा बेकायदेशीर मतदारांना (illegal voters) कायदेशीर करण्याच्या बाजूने आहेत आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ला विरोध करत आहेत.

सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० मध्ये मतदार यादीत (voters’ list)समाविष्ट झाले, तेव्हा त्या इटालियन नागरिक (Italian citizen) होत्या आणि भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी (Prime Minister Indira Gandhi)यांच्या अधिकृत निवासस्थान १, सफदरजंग रोड येथे राहत होते. या पत्त्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी(Rajiv Gandhi,), संजय गांधी (Sanjay Gandhi) आणि मनेका गांधी (Maneka Gandhi.)यांची नावे मतदार यादीत होती. मात्र, १९८० मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाची मतदार (New Delhi Lok Sabha constituency)यादी सुधारित करताना १ जानेवारी १९८० ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आणि मतदान केंद्र १४५ मधील अनुक्रमांक ३८८ वर सोनिया गांधी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले