भंडारा – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके(Bhandara District Central Cooperative Bank) च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी सुनील फुंडे (NCP Sunil Funde) यांची तिसऱ्यांदा, तर उपाध्यक्षपदी भाजपचे (BJP) प्रदीप पडोळे (Pradeep Padole) यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाली.काँग्रेस (Congress) संचालकांच्या छुप्या पाठिंब्यामुळे महायुती प्रणीत सहकार पॅनल(Pranit Sahakar Panel) ने बँकेवर पुन्हा सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवता आली आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी बँकेचे सर्व २१ संचालक उपस्थित होते. कॉग्रेसच्या चार संचालकांनी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे भंडारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि भाजपा आमदार परिणय फुके व शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सहकार पॅनेलने विजय मिळवला.निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनील फुंडे यांची अध्यक्ष आणि प्रदीप पडोळे यांची उपाध्यक्षपदी अधिकृत घोषणा केली.यानंतर बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार सोहळा पार पडला.
सुनील फुंडे म्हणाले की,माझ्यासह सर्व संचालकांनी आतापर्यंत मेहनत घेतली आहे. पुढेही आम्ही बँकेच्या प्रगतीसाठी काम करत राहू. ही शेतकऱ्यांची बँक आहे; त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि बँक आणखी उंची गाठेल.