Best Smart TVs Under Rs 7000: अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टच्या (Flipkart) ‘फ्रीडम सेल’मध्ये (Freedom Sale) ग्राहकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 32-इंच स्मार्ट टीव्ही (Smart TV) खरेदी करू शकता.
एचडी रेडी स्क्रीन, दमदार साउंड आणि अँड्रॉइड टीव्ही ओएसमुळे हे टीव्ही घरबसल्या थिएटरसारखा अनुभव देतात. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्ट टीव्हीविषयी जाणून घेऊया.
1.VW 32S Frameless HD Ready Android Smart LED TV
- किंमत: 7,599 रुपये (Amazon Pay कॅशबॅकसह ₹7,299)
- वैशिष्ट्ये: यामध्ये 178° वाइड व्ह्यू अँगल, फ्रेमलेस डिझाइन, 20W स्टीरिओ साउंड आणि स्क्रीन मिररिंगसारखे स्मार्ट फीचर्स यात आहेत.
2.Foxsky 32 inch HD Ready Smart Android TV
- किंमत: 6,999 रुपये (Flipkart)
- वैशिष्ट्ये: यात बिल्ट-इन अॅप स्टोअर असल्याने तुम्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओसारखे अॅप्स इन्स्टॉल करू शकता. तसेच, 30W डॉल्बी-डिजिटल स्पीकर आणि गूगल व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट मिळतो.
3. KODAK X900PRO 32 inch HD Ready Smart LED TV
- किंमत: 6,999 रुपये (Flipkart)
- वैशिष्ट्ये: यामध्ये 30W चा ऑडिओ आउटपुट आहे. यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट्स आहेत. हा टीव्ही अँड्रॉइडवर आधारित नसला तरी, यामध्ये स्मार्ट टीव्हीचे सर्व फीचर्स मिळतात.
4. SKYWALL Smart LED TV 32SWELS-PRO
- किंमत: 7,299 रुपये (बँक डिस्काउंटनंतर 6,500 रुपयांच्या जवळपास
- वैशिष्ट्ये: यामध्ये अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम, डॉल्बी व्हिजन अॅटमॉस सपोर्ट आणि बेजल-लेस डिझाइन मिळते.