Home / देश-विदेश / निवडणूक आयोगाचा कारनामा ! संन्याशाच्या पोटी पन्नास मुले

निवडणूक आयोगाचा कारनामा ! संन्याशाच्या पोटी पन्नास मुले

वाराणसी – निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये घोळ केला जात असल्याच्या तक्रारी येत असताना त्याच्या नवनवीन सुरसकथा सध्या उघड होत आहेत.काँग्रेसचे...

By: Team Navakal
Varanasi in Uttar Pradesh Swami Ramkamal Das

वाराणसी – निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये घोळ केला जात असल्याच्या तक्रारी येत असताना त्याच्या नवनवीन सुरसकथा सध्या उघड होत आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकमधील (Karnataka) घोळ चव्हाट्यावर मांडल्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून (Varanasi)असाच एक धक्कादायक घोळ समोर आला आहे.

येथील सुप्रसिध्द राम जानकी मंदिराचे संस्थापक स्वामी रामकमल दास ज्यांनी बालपणापासून ब्रम्हचर्य व्रताचे पालन केले आहे त्यांची ५० मुलांचे पिता (father of 50 children.)अशी नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. ही नाव नोंदणी अधिकृत नाही तरी तिचा स्वीकार कसा केला हा प्रश्न आहे.

या वृत्तामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वामी रामकमल (Swami Ramkamal Das,)यांच्या तथाकथित मुलांच्या नावांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानुसार स्वामींच्या सर्वात धाकट्या मुलाचे नाव राघवेंद्र दास (Raghvendra Das) आहे. तो २८ वर्षांचा आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे नाव बनवारी दास (Banwari Das)असून तो ७२ वर्षांचा आहे,अशी नोंद मतदार यादीमध्ये दिसत आहे.

मतदार यादीतील या गंभीर चुकीवरून (blunder)राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission)धारेवर धरले आहे. एका व्यक्तीचे नाव पिता म्हणून अनेक वयोगटातील ५० मतदारांच्या नावामध्ये सामील असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावरून मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोग वाट्टेल तशा नोंदी करत आहे, हे उघड आहे,अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारूफ खान (Congress leader Maroof Khan)यांनी केली. अशा गंभीर चुका वाराणसीमध्ये होऊ शकतात तर इतरत्र का झाल्या नसतील,असा सवालही मारूफ यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर काँग्रेसने हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून या मतचोरीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या