मुंबई – शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant)यांनी फेब्रुवारी महिन्यात मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र तपासात (investigation) हे प्रकरण गैरसमजाचे असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट (“B Final” report) सादर करून अपहरणाची फाईल बंद केली आहे.
१० फेब्रुवारी रोजी तानाजी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऋषिराज (Rishiraj)हा अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कार चालकाने त्यांना पुणे विमानतळावर (Pune Airport.) सोडल्याचे सांगितले होते. त्यावेळी ऋषिराज सोबत त्यांचे काही मित्र होते, त्यामुळे मित्रांनीच त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
पोलिसांनी तातडीने विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधून देशाबाहेर जाण्याआधीच ऋषिराज यांचे चार्टर्ड विमान पुणे विमानतळावर परत बोलावले. पण चौकशीत समोर आले की, त्यांचे अपहरण झाले नव्हते. त्यांनी कोणालाही न सांगता खासगी कामानिमित्त बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला होता. घटनेनंतर पाच महिन्यांनी, तपास पूर्ण करून सिंहगड पोलिसांनी (Sinhgad police)न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी स्वरूप नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.