Home / महाराष्ट्र / Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा ! उच्च न्यायालयाचे निर्देश

Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा ! उच्च न्यायालयाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर – परभणीतील कायद्याचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या...

By: Team Navakal
somnath suryawanshi parbhani case

छत्रपती संभाजीनगर – परभणीतील कायद्याचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench of the Bombay High Court)आज राज्याच्या पोलीस महासंचालकांना एका आठवड्याच्या आत विशेष तपास पथक (Special Investigation Team)स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने यासाठी नेमलेली चौकशी समिती बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.

परभणीत (Parbhani)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान (Constitution)प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. त्यांचा न्यायालयीन कोठडीत (judicial custody.)मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryawanshi)यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा वकील प्रकाश आंबेडकर (advocate Prakash Ambedkar)यांनी युक्तिवाद केला. त्यांनी एक्स पोस्टकरत माहिती दिली की, आज न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना एका आठवड्याच्या आत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली चौकशी बरखास्त केली जाईल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नवीन तपास पथकाला सुपूर्द केली जातील.

Web Title:
संबंधित बातम्या