Independence Day 2025: आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करत असताना, देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या अनेक चित्रपटांची आठवण येते. युद्ध, जवानांचे शौर्य दाखवणारे अनेक चित्रपट आहेत, जे तुम्ही आजच्या दिवशी पाहू शकता.
स्वातंत्र्यदिनी पाहण्यासाठी 5 खास चित्रपट:
लक्ष्य (Lakshya – 2004):
हृतिक रोशनने (Hrithik Roshan) या चित्रपटात करण शेरगिल या तरुणाची भूमिका साधली आहे, जो भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होऊन कारगिल युद्धात (Kargil War) आपले ध्येय शोधतो. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात युद्धाचे जबरदस्त दृश्य आणि शंकर-एहसान-लॉय यांचे प्रेरणादायी संगीत आहे.
रंग दे बसंती (Rang De Basanti – 2006):
रंग दे बसंती हा आजच्या दिवशी पाहण्यासाठी सर्वोच्च चित्रपट आहे .आधुनिक काळातील काही तरुण स्वातंत्र्यसैनिकांवर बनत असलेल्या डॉक्यूमेंट्रीचा भाग होतात आणि त्यापासून त्यांचे जीवन कसे बदलते हे यात दाखवण्यात आले आहे. यात आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन, सिद्धार्थ आणि सोहा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
उरी: द सर्जिकल स्ट्राइक (Uri: The Surgical Strike – 2019):
2016 मधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या (Surgical Strike) सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) मेजर विहान सिंग शेरगिलची भूमिका साकारली आहे.
राझी (Raazi – 2018):
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Indo-Pak War) आधारित हा चित्रपट एका भारतीय गुप्तहेर महिलेची कथा सांगतो. आलिया भट्टने (Alia Bhatt) साकारलेली ही महिला गुप्तहेर म्हणून पाकिस्तानी लष्करी कुटुंबात लग्न करून जाते. आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता.
बॉर्डर (Border – 1997):
1971 च्या भारत-पाक युद्धातील लोंगेवालाच्या (Longewala) लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. यात काही निवडक भारतीय सैनिक त्यांच्या चौकीचे रक्षण करण्यासाठी शत्रूंच्या मोठ्या सैन्याला कसे तोंड देतात हे दाखवले आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.