Mahindra BE 6 Batman Edition: महिंद्राने (Mahindra) वॉर्नर ब्रदर्ससोबत (Warner Bros) मिळून आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘BE 6’ चे खास बॅटमॅन एडिशन (Batman Edition) बाजारात आणले आहे. या लिमिटेड एडिशनमुळे BE 6 चा आकर्षक लूक अधिक शानदार झाला आहे.
सॅटिन ब्लॅक रंगातील ही एसयूव्ही कस्टम डेकल्स आणि प्रीमियम इंटीरियरसह उपलब्ध आहे. नवीन Mahindra BE 6 Batman Edition ची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
Mahindra BE 6 Batman Edition ची खास वैशिष्ट्ये
- या एसयूव्हीला खास सॅटिन ब्लॅक रंग देण्यात आला आहे.
- गाडीच्या पुढील दरवाजांवर बॅटमॅन डेकल्स आणि मागील बाजूस ‘द डार्क नाईट’ची बॅजिंग आहे.
- हब कॅप्स, फ्रंट फेंडर्स आणि रिअर बंपरवर बॅटमॅनचा लोगो आहे.
- यामध्ये 20-इंचचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
- सस्पेंशन आणि ब्रेक कॅलिपर्सवर अल्कमी गोल्ड रंगाचा पेंट आहे, जो ब्लॅक रंगासोबत बोल्ड कंट्रास्ट तयार करतो.
- गाडीच्या छतावर ‘द डार्क नाईट’ ट्रिलॉजीचे बॅट चिन्ह असलेले ‘इन्फिनिटी रूफ’ आहे.
- यात ‘नाईट ट्रेल-कार्पेट लॅम्प्स’ आहेत, ज्यावर बॅटमॅनचे चिन्ह दिसते.
इंटीरियर आणि इतर फीचर्स:
- डॅशबोर्डवर गोल्डन रंगाची बॅटमॅन एडिशन प्लेट लावण्यात आली आहे, जी या गाडीची एक्सक्लुझिव्हिटी दर्शवते.
- इंटीरियरमध्ये गोल्डन सेपिया स्टिचिंग आणि लेदरची प्रीमियम अपहोल्स्ट्री आहे.
- स्टिअरिंग व्हील, टच कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकवरही गोल्डन एक्सेंट्स देण्यात आले आहेत.
किंमत आणि बुकिंग
महिंद्रा BE 6 बॅटमॅन एडिशन ही एक लिमिटेड एडिशन असून, केवळ 300 युनिट्स तयार करण्यात आल्या आहेत. या गाडीची एक्स-शोरूम किंमत (Ex-showroom price) 27.79 लाख रुपये आहे.
गाडीचे बुकिंग 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी 20 सप्टेंबर रोजी ‘इंटरनॅशनल बॅटमॅन डे’ला सुरू होईल.