Home / लेख / Oppo K13 Turbo Pro 5G ची विक्री सुरू; कूलिंग फॅन असलेला देशातील पहिला स्मार्टफोन, किंमत -फीचर्स जाणून घ्या

Oppo K13 Turbo Pro 5G ची विक्री सुरू; कूलिंग फॅन असलेला देशातील पहिला स्मार्टफोन, किंमत -फीचर्स जाणून घ्या

Oppo K13 Turbo Pro 5G

Oppo K13 Turbo Pro 5G Sale: ओप्पो (Oppo) कंपनीने नुकतेच त्यांचे नवीन गेमिंग स्मार्टफोन Oppo K13 Turbo 5G आणि Oppo K13 Turbo Pro 5G भारतात लाँच केले होते. यापैकी, Oppo K13 Turbo Pro 5G ची आजपासून (15 ऑगस्ट) विक्री सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन खास गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला असून, यात बिल्ट-इन कूलिंग फॅन (Built-in cooling fan) देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

किंमत आणि ऑफर

Oppo K13 Turbo Pro 5G दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:

  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज: 37,999 रुपये
  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज: 39,999 रुपये

या स्मार्टफोनवर निवडक बँक कार्ड्स किंवा एक्सचेंज बोनससह 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे किंमत अनुक्रमे 34,999 आणि 36,999 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. याशिवाय, 9 महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय पर्यायही उपलब्ध आहे.

या फोनची विक्री फ्लिपकार्ट), ओप्पो इंडिया ई-स्टोअर आणि निवडक ऑफलाइन स्टोर्सवर सुरू झाली आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

  • डिस्प्ले: यात 6.8-इंचचा LTPS फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्लेआहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्सची पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 चिपसेट आहे.
  • कूलिंग सिस्टीम: यात 7000mm वेपर चेंबर आणि ‘स्टॉर्म इंजिन’ रिअर कूलिंग टेक्नॉलॉजीसह खास थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे जास्त वेळ गेमिंग केल्यावरही फोन गरम होत नाही.
  • कॅमेरा: यात 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपआहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: यात 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 80W सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
  • सॉफ्टवेअर: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित ColorOS 15 वर चालतो. ओप्पो कंपनीने 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन दिले आहे.