मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) नेतृत्व आपल्याकडे आहे, अशी भावना काही लोकांत दिसते. पण त्यांनी आधी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही असा टोला आज शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar s)यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांचे (Ajit Pawar)आता पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक (hijacked)केला आहे. कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर (Suraj Chavan,)दादांनी निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर एका नेत्याने त्यालाच बढती दिली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील एका नेत्याच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.
यावर प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले की, काहींना वाटते की आपण फारच मोठे नेते झालो आहोत. आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू (unnecessarily poke)नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही(We don’t need free advice). बोलण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळावा.
सुनील तटकरे (Sunil Tatkare )म्हणाले की, रोहित पवार यांचे वक्तव्य हे पूर्णपणे बालिश (childish)आहे. त्याची मी फारशी दखल घेत नाही. त्यांनी आधी आपला पक्ष पहावा, त्यातील कुरघोड्या समजून घ्याव्यात. त्यानंतर इतरांवर टीका करण्याचा(criticize others) अधिकार येईल.