Home / राजकीय / मुंबई हेच ठाकरे बंधुंचे टार्गेट ! संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई हेच ठाकरे बंधुंचे टार्गेट ! संजय राऊत यांचे वक्तव्य

UBT MP Sanjay Raut

मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात जाऊ द्यायचा नाही यासाठी ठाकरे बंधू पालिका निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. मुंबई हेच ठाकरे बंधुंचे (Thackeray brothers) टार्गेट आहे,असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपाचे दिल्लीतील नेते (BJP leaders)मुंबई आणि महाराष्ट्राचा नेहमीच द्वेष करत आले आहेत. मोदी-शहांच्या (Modi-Shah)काळात तर महाराष्ट्र लुबाडण्याची परिसीमा गाठली गेली आहे. महाराष्ट्रातल्याच काही नतद्रष्ट्या नेत्यांना हाताशी धरून महाराष्ट्राची लूट चालू आहे.हे थांबवायचे असेल ठाकरे ब्रँडशिवाय (Thackeray brand) पर्याय नाही,असे राऊत म्हणाले.

ठाकरे बंधु एकत्र येण्याने महायुतीला(Mahayuti alliance) काडीचाही परिणाम होणार नाही,या गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan)यांच्या वक्तव्याचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. गिरीश महाजन म्हणजे महर्षि व्यास (Maharshi Vyasa)नव्हेत की ज्यांचा शब्द प्रमाण मानावा. ते प्रमोद महाजनही (Pramod Mahajan)नाहीत. सत्तेच्या जोरावर सध्या ते फुशारक्या मारत आहेत. सत्ता गेली की आपली अवस्था काय असेल याचा विचार त्यांनी करावा.आमच्या नादाला लागू नये,असा इशारा राऊत यांनी दिला.