Home / arthmitra / NPCI चा महत्त्वाचा निर्णय; आता UPI मधील ‘मनी रिक्वेस्ट’ पर्याय बंद, जाणून घ्या कारण काय?

NPCI चा महत्त्वाचा निर्णय; आता UPI मधील ‘मनी रिक्वेस्ट’ पर्याय बंद, जाणून घ्या कारण काय?

UPI Money Request Option Remove

UPI Money Request Option Remove: डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्याची पद्धत बदलणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) P2P (एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला) ‘मनी रिक्वेस्ट’ पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत, UPI ॲपवर मित्रांकडून पैसे मागण्यासाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, सायबर गुन्हेगारांनीया सोयीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. बनावट रिक्वेस्ट पाठवून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून कोणतीही ‘P2P कलेक्ट ट्रान्झॅक्शन’स्वीकारली जाणार नाही, असे NPCI ने स्पष्ट केले आहे.

बदलानंतरही UPI वापरणे सोपेच

या बदलामुळे UPI वापरणे कठीण होणार नाही. उलट, यामुळे सुरक्षितता वाढणार आहे. तुम्ही अजूनही खालील गोष्टी करू शकाल:

  • UPI आयडी, मोबाइल नंबर किंवा बँक डिटेल्स वापरून तात्काळ पैसे पाठवणे.
  • QR कोड स्कॅन करून पैसे भरणे.
  • ऑनलाइन खरेदी आणि डिलिव्हरी ॲप्ससारख्या व्हेरिफाईड मर्चंट्सच्या रिक्वेस्ट स्वीकारणे.
  • हा बदल फक्त P2P म्हणजेच व्यक्ती-व्यक्तीमधील रिक्वेस्टवर लागू होईल, मर्चंट रिक्वेस्टवर (Merchant requests) नाही.

सुरक्षिततेला प्राधान्य

‘मनी रिक्वेस्ट’ पर्याय बंद करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन फसवणूक रोखणे. NPCI च्या मते, यामुळे फसवणुकीच्या घटना घडत होत्या. या निर्णयाचा उद्देश ग्राहकांचे संरक्षण करणे आणि UPI वरील विश्वास अधिक दृढ करणे आहे.

भविष्यात UPI अधिक सुरक्षित होण्यावर भर देणार आहे. यामुळे भलेही ‘रिक्वेस्ट’चा शॉर्टकट बंद होईल, पण त्याचा फायदा सुरक्षा वाढवण्यात नक्कीच होईल. आता पैसे मागण्यासाठी तुम्ही थेट UPI आयडी किंवा QR कोड शेअर करावा लागेल.