Jasprit Bumrah Available For Asia Cup 2025: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Team) आनंदाची बातमी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) खेळताना दिसणार आहे.
रिपोर्टनुसार, बुमराहने निवड समितीला तो स्पर्धेसाठी निवड होण्यास उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आशिया कपमध्ये बुमराहची गोलंदाजी पुन्हा एकदा पाहता येणार आहे.
अलीकडच्या काळात बुमराहच्या वर्कलोडबाबत खूप चर्चा झाली होती. इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन सामने खेळले नाहीत. भारत-ऑस्ट्रेलिया (India-Australia) कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. मात्र, आता बुमराह आशिया कपमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवही फिट
बुमराहसोबतच भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील आशिया कपसाठी फिट असल्याचे समोर आले आहे. एका रिपोर्टनुसार, त्याने बंगळूरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपली फिटनेस टेस्ट (Fitness test) यशस्वीपणे पास केली आहे. जून महिन्यात जर्मनीमध्ये त्याच्या पोटावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.
दरम्यान, आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध (UAE) आपल्या सामन्यांना सुरुवात करेल, तर 14 सप्टेंबर रोजी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे.