Share Market News: शेअर बाजारातील अनेक कंपन्या बोनस शेअर्सची घोषणा करत आहेत. आता अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड (Algoquant Fintech Ltd) ही कंपनी एका वर्षात दुसऱ्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देणार आहे. कंपनीने 1:8 या प्रमाणात बोनस शेअर (Bonus shares) देण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा अर्थ, कंपनीच्या प्रत्येक एका शेअरवरगुंतवणूकदारांना आठ बोनस शेअर मिळतील. या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.
बोनस शेअरसोबतच कंपनीने शेअरची विभागणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. कंपनीचे शेअर 2 भागांत विभागले जातील, ज्यामुळे शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये प्रति शेअर होईल.
रेकॉर्ड डेट आणि कंपनीची कामगिरी
कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूसाठी 18 ऑगस्ट 2025 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. यापूर्वी, जानेवारी 2025 मध्ये कंपनीने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. तसेच, 2021 मध्ये कंपनीच्या शेअरची 5 भागांत विभागणी झाली होती, ज्यामुळे त्याची दर्शनी किंमत 10 रुपयांवरून 2 रुपये झाली होती.
शेअर बाजारात (Stock market) अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेडच्या शेअरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर 1376.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या एका वर्षात शेअरच्या किमतीत 61% ची वाढ झाली आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1409.70 रुपये आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 13,229% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
(टीप: या लेखातील माहिती गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यताअसते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)