Home / देश-विदेश / FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी मोठी प्रतिसाद; देशभरात 1.4 लाख वाहनधारकांची पसंती

FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी मोठी प्रतिसाद; देशभरात 1.4 लाख वाहनधारकांची पसंती

FASTag Annual Pass

FASTag Annual Pass: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टोल प्रवासासाठी ‘फास्टॅग वार्षिक पास’ (FASTag Annual Pass) सुविधा सुरू केली आहे. या पासला पहिल्याच दिवशी देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, 1.4 लाख हून अधिक वाहनधारकांनी हा पास खरेदी केला आहे.

महाराष्ट्रातही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, सुमारे 6,535 वाहनांनी हा पास घेतला आहे.

या पासच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 1.39 लाख व्यवहार टोल नाक्यांवर नोंदवले गेले. केंद्र एनएचएआयने सुमारे 1,150 टोल प्लाझावर ही सुविधा लागू केली आहे. एकाच वेळी सुमारे 20,000 ते 25,000 यूजर्स राजमार्गयात्रा ॲपचाही वापर करत आहेत, आणि वार्षिक पास वापरकर्त्यांना टोल शुल्क शून्य कापल्याचे ‘एसएमएस’व्दारे माहिती दिली जात आहे.

पासचे फायदे आणि वापर कसा करावा?

  • अमर्याद प्रवास: हा पास 3,000 रुपयांच्या एकाच पेमेंटमध्ये एका वर्षासाठी किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी वैध आहे. यामुळे वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही.
  • वेळ आणि पैशाची बचत: एका वर्षासाठी तुम्ही अमर्यादवेळा टोल क्रॉस करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
  • सुरक्षित प्रवास: टोल प्लाझावर कोणताही थांबा न घेता जलद आणि सोयीस्कर प्रवास करता येतो.

हा पास सर्व गैर-व्यावसायिक (Non-commercial) वाहनांसाठी उपलब्ध आहे. एकदा 3,000 रुपयांचे पेमेंट केल्यावर ‘राजमार्गयात्रा ॲप’ किंवा एनएचएआयच्या वेबसाइटवरून हा पास दोन तासांत अ‍ॅक्टिव्ह होतो.

या पासधारकांना मदत करण्यासाठी एनएचएआयने प्रत्येक टोल प्लाझावर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच, त्यांच्या तक्रारी निवारणासाठी 1033 राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन अधिक मजबूत करण्यात आली आहे.