Sara Tendulkar Pilates Studio in Mumbai : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे प्रवास करताना, आहाराबाबतची माहिती देणारे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. आता सारा एक उद्योजिका बनली आहे.
तिने मुंबईच्या अंधेरी भागात स्वतःचे ‘पिलेट्स ॲकॅडमी बाय सारा तेंडुलकर’ नावाचे पिलेट्स स्टुडिओ (Pilates studio) सुरू केला आहे. साराने तिच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. दुबईतीलएका प्रसिद्ध फ्रेंचाइजीची ही भारतातील चौथी शाखा आहे.
27 वर्षीय सारा तेंडुलकरने अनेकदा सोशल मीडियावर पिलेट्सबद्दलचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे. हा स्टुडिओ शारीरिक हालचाल, फिटनेस आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक जागा म्हणून डिझाइन करण्यात आला आहे.
आई-वडिलांच्या उपस्थितीत उद्घाटन
या स्टुडिओच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खूप खास होता. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी सचिन तेंडुलकर आणि आई अंजली तेंडुलकर तिच्यासोबत उपस्थित होते. कार्यक्रमात कुटुंब आणि मित्रमंडळींसह अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चांदोक (Saaniya Chandhok) देखील हजर होती.
या नव्या प्रवासाबद्दल साराने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, ज्यात तिने हा स्टुडिओ फक्त एक जागा नसून, काळजी आणि उत्साहाने तयार केलेली एक कम्युनिटी असल्याचे म्हटले आहे. या स्टुडिओचे अधिकृत लॉन्चिंग 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दरम्यान, सारा तेंडुलकरबाबत सांगायचे तर ती सोशल मीडिया पर्सनालिटीसोबतच एक न्यूट्रिशिनिस्ट देखील आहे. ती सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालकही आहे, जिथे ती खेळ, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांवर काम करते.