पणजी- गोव्यात (Goa) खासगी विद्यापीठ कायद्याअंतर्गत राज्य सरकारने बडोदा (Gujarat) येथील पारुल विद्यापीठाला (University) गोव्यात पहिले खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. किटला-केपे (Kitla-Kepe) येथील ओएनजीसीजवळील सर्व्हे क्र. ७८/१ या ठिकाणी विद्यापीठाचा कॅम्पस उभारण्यात येत आहे.
या संदर्भातील अधिसूचना उच्च शिक्षण संचालनालयाने (Directorate of Higher Education) जारी केली आहे. राज्यात खासगी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी २०२० साली खासगी विद्यापीठ कायदा संमत करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत पारुल विद्यापीठाला मान्यता मिळाली असून, किटला येथील कॅम्पस पूर्ण झाल्यावर सरकारने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांसाठी या वर्षीपासूनच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
हे विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर त्याचा गोवा विद्यापीठाशी कोणताही संबंध राहणार नाही. विद्यापीठाला आपल्या नियमानुसार शुल्क निश्चित करून प्रवेश देण्याचा अधिकार असेल अशी माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी दिली.
दरम्यान थिवी येथे वर्ल्ड पीस विद्यापीठाचा कॅम्पस उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. खासगी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस पूर्ण होईपर्यंत एखाद्या इमारतीत तात्पुरते केंद्र (Transit Camp) स्थापन करण्याची मुभा देण्यात आली