Home / News / पंजाबच्या ऊपाली गावात एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

पंजाबच्या ऊपाली गावात एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

Ban on the sale of energy drinks in Upali village of Punjab

Ban on the sale of energy drinks in Upali village of Punjab

अमृतसर – पंजाबमधील सगरुर जिल्ह्यातील ऊपाली गावाने एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घातली.(Energy drink ban Punjab) या गावाच्या ग्रामपंचायतीने गावाच्या हिताचे अनेक निर्णय एकमताने घेतले असून तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंचांनी म्हटले आहे.(Upali village)
ऊपाली गावाचे सरपंच जागीर सिंग यांनी म्हटले की, गावाच्या दहा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. आमचे सर्व सदस्य ३५ ते ४२ वयोगटातील आहेत. (Punjab village ban)गावातील सर्व दुकानदारांना कोणत्याही प्रकारचे एनर्जी ड्रिंक विकण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येणार आहे. गावातील तरुणांच्या आरोग्यासाठी व त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कोणीही (Public health safety Punjab)अंमली पदार्थ विकू नये , कोणत्याही औषधांच्या दुकानांनी डॉक्टरच्या लेखी सूचनेशिवाय सिरींज विकू नये, म्युझिक सिस्टीम असलेल्या ट्रॅक्टरनी गावात आल्यावर संगीत बंद करावे, मोटरसायकलला कर्कश हॉर्न न बसवणे, गावातील तरुण तरुणींनी विवाह केल्यास त्यांना वेगळे राहण्यासाठी घर देऊ नये , बाहेरून गावात आलेल्यांची पोलीस तपासणी करावी , त्याचप्रमाणे जमिनींचे व्यवहार पंचायतीच्या सल्ल्याने करावेत असेही काही निर्णय घेण्यात आले आहेत. या विविध निर्णयांनी ऊपाली गावाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.