Home / लेख / Samsung च्या 200MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, हजारो रुपयांची होईल बचत; पाहा डिटेल्स

Samsung च्या 200MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, हजारो रुपयांची होईल बचत; पाहा डिटेल्स

Samsung Galaxy S25 Ultra Offer

Samsung Galaxy S25 Ultra Offer: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या अ‍ॅमेझॉनवर (Amazon) सॅमसंगच्या (Samsung) सर्वात पॉवरफुल स्मार्टफोनपैकी एक असलेल्या Samsung Galaxy S25 Ultra वर एक जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे.

या ऑफरमध्ये तुम्ही हा फोन आता केवळ 1,07,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, बँक ऑफर आणि कॅशबॅकमुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.

हा फोन S पेन सपोर्टसह येतो आणि यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. तसेच, फोनमध्ये अनेक दमदार एआय फीचर्स (AI Features) देखील आहेत. या फोनवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बंपर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स

सॅमसंगच्या या फोनची मूळ किंमत, 1,41,999 रुपये आहे. मात्र, फोन डिस्काउंटनंतर 1,29,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. यावर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही आणखी बचत करू शकता:

  • एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड: 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट.
  • फेडरल बँक आणि येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय (EMI): 1,000 रुपयांचा डिस्काउंट.
  • अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड: 5% कॅशबॅक, ज्यामुळे तुम्हाला 3,239 रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत होऊ शकते.

यासोबतच, तुम्ही हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवर (No-Cost EMI) देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा फक्त 4,863 रुपये भरावे लागतील. जुना फोन देऊन नवीन फोन घेणाऱ्यांसाठी 47,200 रुपये पर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे, जो तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Galaxy S25 Ultra चे खास फीचर्स

  • डिस्प्ले: यात 6.9-इंच डायनामिक एलटीपीओ एमोलेड 2एक्स (LTPO AMOLED 2X) डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 एलिट (Snapdragon 8 Elite) प्रोसेसर आहे.
  • कॅमेरा: कॅमेराच्या बाबतीत हा फोन खूप दमदार आहे. यात ओआयएस सपोर्टसह (OIS support) 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे. याशिवाय 10-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील आहे.
  • बॅटरी: यात 5000mAH ची मोठी बॅटरीदेण्यात आली आहे.