Post Office Recurring Deposit Scheme: तुम्ही जर सुरक्षित आणि चांगला परतावादेणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्ही अगदी कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक (Investment) सुरू करू शकता आणि काही वर्षांतच लाखोंचा मोठा फंड तयार करू शकता.
आज आपण जाणून घेऊया की या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही 17 लाखांचा फंड कसा तयार करू शकता.
रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना आणि फायदे
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटवर सध्या 6.7% दराने निश्चित परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असतो, परंतु तुम्ही तो आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
अशी तयार होईल 17 लाखांची रक्कम:
- जर तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली, तर 5 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये होईल.
- या 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1.13 लाख रुपये व्याज मिळेल.
- याचा अर्थ, 5 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 7.13 लाख रुपये मिळतील.
गुंतवणूक 5 वर्षांनी वाढवल्यास:
- जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी 5 वर्षांसाठी वाढवली, तर तुमची एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये होईल.
- यावर तुम्हाला 5,08,546 रुपये व्याज मिळेल.
- अशा प्रकारे, एकूण 10 वर्षांमध्ये तुम्ही 17 लाखांपेक्षा जास्त (17,08,546 रुपये) चा मोठा फंड तयार करू शकता.
या योजनेत तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो, कारण त्याला कोणत्याही बाजारातील चढ-उतारांचा धोका नसतो. त्यामुळे, ही योजना कमी जोखीम घेऊन मोठा फंड तयार करू पाहणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे.