Home / News / ९०व्या वर्षीही काम करायचे का? अण्णा हजारे संतापले

९०व्या वर्षीही काम करायचे का? अण्णा हजारे संतापले

"Should I keep working even at 90? Anna Hazare expresses anger

“Should I keep working even at 90? Anna Hazare expresses anger

पुणे –ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो (Anti-corruption activist)असलेला एक बॅनर पाषाण परिसरात लावण्यात आला आहे. यावर आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे, असा मजकूर लिहिलेला आहे. अण्णांना याद्वारे आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या बॅनरवरून अण्णा हजारे संतापले आहेत. (Anna Hazare 90 years old)वयाच्या ९० व्या वर्षीही काम करावे का? असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे.

अण्णा म्हणाले की, आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे.(Should I work at 90)भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने केली आहेत. माझ्यामुळे या देशात दहा कायदे झाले. माहितीच्या अधिकाराचा कायदा माझ्यामुळे मिळाला. देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त असे कायदे माझ्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आले आहेत. आता माझे वय झाले आहे. मी ९० वर्षांचा झाल्यानंतरही काम करायचे आणि तुम्ही झोपून राहायचे का ? कोणी ही अपेक्षा करत असेल तर ते चुकीचे आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे. त्यांचे या देशाप्रती कर्तव्य आहे. कारण तेही या देशाचे नागरिक आहेत. फक्त बोट दाखवून हे करा, ते करा म्हणणे चुकीचे आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. तरुणांनी आता जागे व्हायला हवे.