Shubhanshu Shukla Meets Narendra Modi: भारताचे अंतराळवीर आणि हवाई दलाचे अनुभवी टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधानांना (Shubhanshu Shukla Meets Narendra Modi) एक विशेष भेट दिली.
शुंभाशु शुक्ला हे नुकतेच अंतराळातून परतल्यानंतर भारतात आले आहेत. त्यानंतर आता त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) असताना Ax-4 मोहिमेत (Mission) स्वतःसोबत नेलेला भारतीय राष्ट्रध्वज (National Flag) पंतप्रधानांना दिला. या कृतीतून भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचे प्रतीक दाखवण्यात आले.
या भेटीत शुक्ला यांनी पंतप्रधानांना त्यांच्या प्रवासातील आव्हानांबद्दल सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रूसह दीर्घकाळ अंतराळात काम करण्याचा त्यांचा अनुभव देशाच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये मानवी शरीरविज्ञानावरील अभ्यास आणि अंतराळातील शेतीसाठीच्या नव्या तंत्रज्ञानावर केलेल्या प्रयोगांची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी शुक्ला यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, शुक्ला यांनी केवळ तांत्रिक यश मिळवले नाही, तर त्यांनी एका संपूर्ण पिढीला पृथ्वीच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे.
शुक्ला यांच्या कामगिरीचे संसदेतही कौतुक
संसदेतही ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जोरदार चर्चा झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्ला यांच्या यशाची प्रशंसा केली आणि ही कामगिरी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील स्वप्नांसाठी किती महत्त्वाची आहे, हे सांगितले.