Delhi CM Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर आज (20 ऑगस्ट) त्यांच्या निवासस्थानी झालेल्या जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. (Delhi CM Rekha Gupta Attack)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती अंदाजे 35 वर्षांचा असून, काही कागदपत्रे घेऊन तो मुख्यमंत्र्यांकडे आला होता आणि अचानक त्याने त्यांच्यावर हल्ला केला.
रिपोर्टनुसार, आरोपीने आधी मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली आणि त्यानंतर तो ओरडू लागला. त्यानंतर त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. सध्या, सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी सांगितले की, “आरोपीने हल्ला करण्यापूर्वी केलेल्या वक्तव्यावरून तो दिल्लीतील एका राजकीय पक्षाशी संबंधित असावा, ज्याला आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल नाराज आहे.”
#WATCH जनसुनवाई के दौरान दिल्ली की मुख्यमंत्री रेखा गुप्ता पर हमला | मौके पर मौजूद अंजलि ने कहा, "यह बहुत गलत हुआ है। जनसुनवाई पर सबका हक है। अगर कोई बहरूपिया उन्हें थप्पड़ मार सकता है, तो यह बहुत बड़ी बात है…मैं वहीं थी…वह व्यक्ति बोल रहा था और उसने अचानक थप्पड़ मार दिया।… pic.twitter.com/NZeDfuR4e5
— ANI_HindiNews (@AHindinews) August 20, 2025
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “ जनसुनावणीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. जर एखादी व्यक्ती मुख्यमंत्र्यांना कानशिलात मारू शकते, तर ही मोठी गोष्ट आहे. तो माणूस बोलत होता आणि अचानक त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव म्हणाले, “ही एक दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री संपूर्ण दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात. अशा घटनांचा जितका निषेध करू, तेवढा कमीच आहे. ही घटना महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते. जर दिल्लीचे मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील, तर सामान्य माणूस आणि महिला कशा सुरक्षित राहतील?”
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त (DCP) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, याआधी आप नेते अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर देखील अनेकवेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
हे देखील वाचा –
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी