Thackeray Brothers BEST election loss: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. (Thackeray Brothers BEST election loss)
या पराभवामुळे आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत देणाऱ्या ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता असलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ही ‘लिटमस टेस्ट’ (Litmus test) मानली जात होती. मात्र, या निवडणुकीत ठाकरे बंधूंना 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
बेस्ट निवडणुकीचा निकाल आणि महायुतीचा विजय
मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालात शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तर, भाजप नेते प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ प्रणित ‘सहकार समृद्धी पॅनेल’ला 7 जागांवर विजय मिळाला.
जागा दाखवली…. pic.twitter.com/waPJMkMuL9
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 19, 2025
निकालानंतर प्रसाद लाड यांनी ट्वीट करून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. “ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना “जागा दाखवली” अशा शब्दात टोला लगावला.
ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का
बेस्ट निवडणुकीतील या दारुण पराभवामुळे ठाकरे गटाने 9 वर्षांची जुनी सत्ता गमावली आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर एकत्र येत ‘उत्कर्ष पॅनेल’च्या माध्यमातून ताकद दाखवण्याची संधी गमावल्यामुळे, ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. या पराभवानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची पुढील रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे देखील वाचा –
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी