Home / देश-विदेश / इंडिया पोस्टचा ऐतिहासिक बदल! 5800 कोटींच्या गुंतवणुकीतून ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ सुरू; जाणून घ्या वैशिष्ट्ये

इंडिया पोस्टचा ऐतिहासिक बदल! 5800 कोटींच्या गुंतवणुकीतून ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ सुरू; जाणून घ्या वैशिष्ट्ये

India Post Advanced Postal Technology

India Post Advanced Postal Technology: भारताच्या डिजिटल प्रवासात एक मोठे पाऊल टाकत इंडिया पोस्टने (India Post) देशभरात ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ (India Post Advanced Postal Technology) सुरू केली आहे. 5,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे इंडिया पोस्ट एक जागतिक दर्जाची सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्था म्हणून उदयास येईल असे सांगितले आहे.

डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित हा संपूर्णपणे स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हे नवीन तंत्रज्ञान इंडिया पोस्टला आधुनिक लॉजिस्टिक्स कंपन्यांप्रमाणेच डिजिटल सेवा पुरवणे शक्य करणार आहे.

‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’चे प्रमुख फायदे (India Post Advanced Postal Technology)

  • UPI पेमेंटची सोय: या नवीन तंत्रज्ञानामुळे आता इंडिया पोस्टमध्ये कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना UPI पेमेंट (UPI payments) करता येणार आहे.
  • ई-कॉमर्सला चालना: यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राला मोठा फायदा होणार असून, इंडिया पोस्टची सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम बनेल.
  • रिअल-टाइम निर्णय: यामुळे रिअल-टाइम निर्णय घेणे शक्य होणार असून, कामकाजाचा खर्च कमी होईल.
  • डिजिटल बुकिंग ते डिलिव्हरी: हे तंत्रज्ञान बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल बनवेल.
  • डिजीपिन: डिलिव्हरी अधिक अचूक करण्यासाठी 10 अंकी ‘डिजीपिन’ (DIGIPIN) सुविधा देण्यात आली आहे.

हे तंत्रज्ञान 4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सुरू झाले आहे. यात 1.70 लाखांहून अधिक कार्यालये APT प्रणालीवर काम करत आहेत. या मोठ्या बदलासाठी 4.6 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

या नव्या प्रणालीने एका दिवसात 32 लाख बुकिंग आणि 37 लाख डिलिव्हरी यशस्वीपणे हाताळल्या आहेत, असे इंडिया पोस्टने सांगितले आहे.

हे देखील वाचा –

सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार? जाणून घ्या काय आहे नवीन विधेयक

युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी

Share:

More Posts