Home / देश-विदेश / जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा

Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar Resignation

Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar Resignation: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या अचानक राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी धनखड यांच्या या निर्णयामागे एक मोठे ‘गुपित’ दडल्याचा दावा केला आहे. (Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar Resignation)

धनखड यांनी पद सोडले आणि आता ते लोकांच्या नजरेपासून का लपून आहेत, यामागे एक मोठे कारण असल्याचा दावा त्यांनी केला.

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना राहुल गांधींनी म्हणाले की, “मी नुकताच एका व्यक्तीशी बोलत होतो आणि त्याला विचारले की, माजी उपराष्ट्रपती कुठे गेले? ते निघून गेले आहेत.”

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांच्या फोनवरून त्यांना धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “तुम्हापैकी काहींना हे माहिती असेल, काहींना नसेल, पण त्यामागे एक मोठे कारण आहे,” असा दावा त्यांनी केला. राज्यसभेत नेहमी सक्रिय असलेले धनखड अचानक शांत का झाले, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला.

जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात “आरोग्याचे” कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांच्या या अचानक राजीनाम्याने अनेक चर्चांना तोंड फुटले आहे.

रिपोर्टनुसार, ‘घरात रोख रक्कम’ प्रकरणात सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगासाठी (Impeachment) धनखड यांनी काही विरोधी नेत्यांना राज्यसभेत नोटीस देण्यास सांगितले होते, तर केंद्र सरकारला ती नोटीस केवळ लोकसभेत आणायची होती. या मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, असे सांगितले जात आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित

दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) हे एनडीएचे उमेदवार आहेत. तर माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी (B Sudarshan Reddy) यांना विरोधकांनी आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

हे देखील वाचा –

इंडिया पोस्टचा ऐतिहासिक बदल! 5800 कोटींच्या गुंतवणुकीतून ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ सुरू; जाणून घ्या वैशिष्ट्ये

सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार? जाणून घ्या काय आहे नवीन विधेयक

युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव