Home / देश-विदेश / रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल

रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल

Indian Railways luggage rules

Indian Railways luggage rules: भारतात रेल्वे हे सर्वात स्वस्त प्रवासाचे माध्यम मानले जाते. लाखो लोकं दररोज रेल्वेतून प्रवास करतात. मात्र, आता रेल्वेतून प्रवास करताना काही नियम पाळावे लागणार आहेत.

भारतीय रेल्वे (Indian Railways) आता विमान प्रवासाप्रमाणेच सामानासाठी (Indian Railways luggage rules) कठोर नियम लागू करणार आहे. या नियमांनुसार, प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक वजन तपासणी यंत्रावरून आपले सामान तपासावे लागेल. सामानाचे वजन ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क किंवा दंड भरावा लागेल.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या नियमांचा उद्देश लांबच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक आरामदायक आणि कार्यक्षम प्रवास अनुभव देणे आहे. हे नवे नियम सुरुवातीला उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनमधील प्रमुख स्थानकांवर लागू केले जातील.

प्रवासाच्या श्रेणीनुसार सामानाची मर्यादा (Indian Railways luggage rules)

  • एसी फर्स्ट क्लास: 70 किलो
  • एसी टू टियर: 50 किलो
  • एसी थ्री टियर आणि स्लीपर क्लास: 40 किलो
  • जनरल क्लास: 35 किलो

याशिवाय, निर्धारित वजनात असले तरी आकार मोठा असल्यामुळे प्रवासाला अडथळा निर्माण करणाऱ्या सामानावरही दंड आकारला जाऊ शकतो.

आधुनिक रेल्वे स्थानके आणि नवे नियम

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत अनेक रेल्वे स्टेशन्सचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानकांवर येत्या काळात कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रवासासाठी आवश्यक वस्तूंची विक्री करणारे प्रीमियम स्टोअर्सही सुरू केले जातील.

हे देखील वाचा –

शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे भारतात कार्यालय? बांगलादेशचे आरोप सरकारने फेटाळले

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा

इंडिया पोस्टचा ऐतिहासिक बदल! 5800 कोटींच्या गुंतवणुकीतून ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ सुरू; जाणून घ्या वैशिष्ट्ये