Home / महाराष्ट्र / महाराष्ट्रातील कोणत्या टोल नाक्यांवर FASTag वार्षिक पास लागू आहे? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील कोणत्या टोल नाक्यांवर FASTag वार्षिक पास लागू आहे? वाचा संपूर्ण यादी

FASTag Annual Pass

FASTag Annual Pass: देशभरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालकांसाठी वार्षिक फास्टॅग पास सेवा (FASTag Annual Pass) सुरू केली आहे. आता तुम्ही फक्त 3,000 रुपये भरून वर्षभर किंवा 200 टोल ट्रिप्स (यापैकी जे आधी पूर्ण होईल) राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करू शकता.

ही सेवा खासगी वाहनांसाठी, म्हणजेच कार, जीप आणि व्हॅनसाठी आहे. हा पास देशातील एकूण 1,144 टोल नाक्यांवर लागू असेल व ज्यामध्ये महाराष्ट्रातील 90 पेक्षा अधिक टोल नाक्यांचा समावेश आहे.

वार्षिक फास्टॅग पास लागू असलेल्या महाराष्ट्रातील टोल नाक्यांची यादी (FASTag Annual Pass)

तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या टोल नाक्यांवर या पासचा वापर करू शकता, त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.

  • चारोटी टोल नाका – पालघर
  • खानीवाडे टोल नाका – पालघर
  • नांदगाव टोल नाका – अमरावती
  • मानसर टोल नाका – नागपूर
  • माथनी टोल नाका – नागपूर
  • कामटी कन्हान बायपास टोल – नागपूर
  • नागपूर बायपास – नागपूर
  • बोरखेडी टोल नाका – नागपूर
  • गोंदखैरी टोल नाका – नागपूर
  • चंपा टोल नाका – नागपूर
  • भागिमरी टोल नाका – नागपूर
  • हलदगाव टोल नाका – नागपूर
  • केलापूर टोल नाका – यवतमाळ
  • भांबराजा टोल नाका – यवतमाळ
  • सेंदूरवडा टोल नाका – भंडारा
  • शिरपूर टोल नाका – धुळे
  • सोनगीर टोल नाका – धुळे
  • लालिंग टोल नाका – धुळे
  • कारंजा टोल नाका – वर्धा
  • दरोडा टोल नाका – वर्धा
  • हसनापूर टोल नाका – वर्धा
  • उद्री टोल नाका – बुलढाणा
  • खार्बी टोल नाका – चंद्रपूर
  • हतनूर टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
  • करोडी टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
  • तासवडे टोल नाका – सातारा
  • आनेवाडी टोल नाका – सातारा
  • किणी टोल नाका – कोल्हापूर
  • सावळेश्वर टोल नाका – सोलापूर
  • वरवडे टोल नाका – सोलापूर
  • वालसंग टोल नाका – सोलापूर
  • पाटस टोल नाका – पुणे
  • सरडेवाडी टोल नाका – पुणे
  • खेड शिवापूर टोल नाका – पुणे
  • चांदवड टोल नाका – नाशिक
  • घोटी टोल नाका – नाशिक
  • नाशिक सिन्नर टोल नाका – नाशिक
  • बसवंत टोल नाका – नाशिक
  • अर्जुनला टोल नाका – ठाणे
  • तमालवाडी टोल नाका – धाराशिव
  • येडशी टोल नाका – धाराशिव
  • पारगाव टोल नाका – धाराशिव
  • फुलेवाडी टोल नाका – धाराशिव
  • तलमोड टोल नाका – धाराशिव
  • पडळशिंगी टोल नाका – बीड
  • सेलूआंबा टोल नाका – बीड
  • माळीवाडी टोल नाका – जालना
  • धोकी टोल नाका – अहिल्यानगर
  • धुंबरवाडी टोल नाका – अहिल्यानगर
  • बडेवाडी – अहिल्यानगर
  • अशिव टोल नाका – लातूर
  • नशिराबाद – जळगाव
  • ओसरगाव – सिंधुदुर्ग
  • नंदानी – सोलापूर-विजापूर
  • चाचाडगाव – नाशिक-पेठ
  • अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
  • बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
  • इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
  • पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
  • डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
  • पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
  • पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
  • उंडेवाडी – पाटस-बारामती
  • बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
  • निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
  • पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
  • बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
  • भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
  • करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
  • निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
  • नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
  • कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
  • तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
  • तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
  • मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
  • धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
  • अष्टा – औसा ते चाकूर
  • मालेगाव – चाकूर ते लोहा
  • परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
  • बिजोरा – वारंगा ते महागाव
  • खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
  • नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
  • पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
  • बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
  • करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
  • कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
  • माळीवाडी-भोकरवाडी – येडशी छत्रपती संभाजीनगर
  • नायगाव – मंठा-पातुर
  • हिरापूर – गडचिरोली-मूल
  • वडगाव – कळंब राळेगाव वडकी
  • उमरेड – कळंब राळेगाव वडकी

पास कसा खरेदी कराल?

तुम्ही राजमार्गयात्रा ॲप (Rajmargyatra App) डाउनलोड करून किंवा एनएचएआयच्या (NHAI) वेबसाइटवर लॉगइन करून हा पास खरेदी करू शकता. ऑनलाइन पेमेंट यशस्वी झाल्यावर हा पास तुमच्या फास्टॅगसोबत जोडला जाईल. या सुविधेमुळे टोल प्लाझावरील गर्दी कमी होऊन लांबचा प्रवास अधिक सोयीचा आणि कमी खर्चाचा होईल.

हे देखील वाचा –

रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल

शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे भारतात कार्यालय? बांगलादेशचे आरोप सरकारने फेटाळले

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा