Home / देश-विदेश / Bomb Threat Emails : दिल्लीतील नामांकित शाळांना तिसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी

Bomb Threat Emails : दिल्लीतील नामांकित शाळांना तिसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी

Delhi Schools Bomb Threats

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील शाळांना आठवड्याभरात तिसऱ्यांदा बॉम्ब धमकी (bomb threats) मिळाल्याने शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत ८० शाळांना धमकी मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस तपास करत आहेत.आज दिल्लीतील पाच शाळांना बॉम्ब धमक्या मिळाल्या. त्यात प्रसाद नगर आणि द्वारका सेक्टर ५ (Prasad Nagar and Dwarka Sector 5 )यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनास्थळी तपास सुरू आहे. ही या आठवड्यातील तिसरी धमकीची घटना आहे. काल दिल्लीतील ५० हून अधिक शाळांना बॉम्ब धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या शाळांमध्ये एसकेव्ही हौज राणी (SKV Hauz Rani), मालवीय नगर येथील शाळा आणि आंध्र स्कूल, करोल बाग यांचा समावेश होता. धमकी मिळालेल्या शाळांमध्ये बहुतेक शाळा द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल (Delhi Public School), बीजीएस इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, श्री व्हेन्कटेश्वर स्कूल आणि ग्लोबल स्कूल यांचा समावेश होता. डीपीएस शाळेने विद्यार्थ्यांना घरी पाठवले आणि त्या दिवशी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली.पोलिसांनी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि श्वान पथकासह (dog squads)अनेक पथकांची नियुक्ती केली. प्रत्येक शाळेची तपासणी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध ऑपरेशन पूर्ण झाले आहे आणि काही संशयास्पद आढळलेले नाही.सायबर फॉरेन्सिक तज्ञ आता ईमेल्स पाठवणाऱ्याचा आयपी पत्ता ट्रेस (IP address of the sender.)करत आहेत. धमक्यांमुळे दिल्ली पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना अशा प्रकारच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत. सायबर सुरक्षा आणि पोलीस पथकांनी या प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरू आहे.