Home / News / उत्तर प्रदेशात आज शाळांमध्ये अवकाश दिन साजरा करणार

उत्तर प्रदेशात आज शाळांमध्ये अवकाश दिन साजरा करणार

https://www.navakal.in/uncategorized/holiday-day-will-be-celebrated-in-schools-in-uttar-pradesh-today-marathi-news/

लखनऊ – मुलांच्या मनात कुतुहल निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाळांमध्ये अवकाश विज्ञान (science) आणि तंत्रज्ञानाबद्दल (technology) आज दुसरा राष्ट्रीय अवकाश दिन (National Leisure Day) साजरा केला जाणार आहे. यामध्ये सर्व सरकारी प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शाळांसोबतच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये हा उपक्रम होईल.

या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीआरटीईकडूनही भारत एक उद्योन्मुख अवकाश सत्ता या विषयावरील एक अभ्यास संदर्भ पुस्तिकाही प्रसिद्ध केली जाणार आहे. एनसीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही पुस्तिका उपलब्ध असेल. ही पुस्तिका विद्यार्थ्यांचे वय आणि इयत्ता यांचा विचार करून तयार करण्यात येणार आहे. यामध्ये चांद्रयान, आदित्य-एल१ आणि गगनयान यासारख्या भारतीय अवकाश मोहिमेच्या यशोगाथांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश शालेय शिक्षण विभागाच्या महासंचालक कांचन वर्मा यांनी सांगितले, की या उपक्रमासाठीचे अभ्यास साहित्य सध्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. दिक्षा, निष्ठा, एनसीईआरटी संकेतस्थळ यासारख्या ठिकाणी यासंदर्भातील नियमित अपडेट्स उपलब्ध करून दिले जातात.