PIL Filed in Supreme Court Seeking Deregistration of Congress Party
नवी दिल्ली – काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीशकुमार अग्रवाल (Satish Kumar Aggarwal)यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्याचबरोबर (ECI defamation Congress)लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांची निवडणूक आयोगाविरोधात (ECI)सुरू केलेल्या मतचोरी मोहिमेची चौकशी करण्याचीही मागणी केली.(Congress vote theft probe)
ॲड. अभिषेक यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले की,काँग्रेसने पक्ष नोंदणीच्या वेळी संविधानाशी निष्ठा राखण्याची शपथ घेतली होती. मात्र सध्या पक्षनेते ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यातून त्यांनी ही शपथ मोडली आहे.(Bihar voter list case)बिहारमधील विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मतचोरी असा प्रचार करणे आणि निवडणूक आयोगावर केंद्र सरकारशी संगनमताचे आरोप करणे न्यायालयीन प्रक्रिया आणि संविधानाचा अपमान आहे. राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसद सदस्य म्हणून घेतलेल्या शपथेचेही उल्लंघन केले आहे.काँग्रेस नेत्यांनी माध्यमांतून निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात असभ्य, असंसदीय भाषा वापरली आहे.बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील २०२४ च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या मतदार यादीतील फेरफार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT)स्थापन करावी.काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल हेही या प्रकरणात याचिकाकर्ता आहेत.