Home / महाराष्ट्र / बीडमध्ये ३३५ जणांचे शस्त्रपरवाने रद्द केले

बीडमध्ये ३३५ जणांचे शस्त्रपरवाने रद्द केले

बीड – बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ३३५ जणांचे शस्त्र परवाने (335 weapon licenses) रद्द केले आहेत....

By: Team Navakal
335 Weapon Licenses Cancelled in Beed

बीड – बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ३३५ जणांचे शस्त्र परवाने (335 weapon licenses) रद्द केले आहेत. आणखी काही प्रकरणांची चाचपणी सुरू असून, गरज नसतानाही शस्त्र परवाना घेऊन हिरोगिरी करणाऱ्यांवर कारवाईचा (strict action)बडगा उगारण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील १,२८४ जणांकडे (1,284 people) शस्त्र परवाने असल्याचे प्रशासकीय चौकशीत (inquiry)समोर आले होते. राजकीय दबावाखाली आणि पक्षप्रवेशाच्या अटीवर अनेकांना शस्त्र परवाने (licenses)मिळाले होते. त्यामुळे वाळू माफिया, मटका व गुटखा विक्रेते यांच्याकडेही शस्त्र परवाने असल्याचे उघड झाले होते. परवाना मिळाल्यानंतर काही जण शस्त्राचा धाक दाखवून अवैध काम करत होते. यावर कार्यवाही करत जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector)आतापर्यंत ३३५ परवाने रद्द केले.

पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना अनेक परवाने रद्द करण्याची शिफारस केल्यावर काही अर्जदारांनी आयुक्त कार्यालयात(Commissioner’s office)धाव घेतली. मात्र, आयुक्तांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या १७५ जणांचे अर्ज फेटाळले.

Web Title:
संबंधित बातम्या