पुणे – हनी ट्रॅप (Honey-Trap)आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील (sexual assault cases)आरोपी प्रफुल्ल लोढाला (Prafull Lodha)पिंपरी- चिंचवड मधील बावधन पोलिसांनी आज अटक केली. लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात(Bavdhan police station) एका ३६ वर्षीय पीडितेने प्रफुल्ल लोढाविरोधात तक्रार दिली होती.
याच गुन्ह्याच्या तपासाठी पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतले आहे. लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावे, यासाठी न्यायालयात हस्तांतरित वॉरंट (transfer warrant to) मागण्यात आले होते. ती मंजुरी मिळताच आज सकाळी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail)पोलिसांनी लोढाचा ताबा घेतला.
२७ मे २०२५ रोजी लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून महिलेला पुण्यातील बालेवाडी येथील नामांकित हॉटेलमध्ये बोलावले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याआधी हनी ट्रॅपसह एका १६ वर्षीय मुलीवर काम देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईमधील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात लोढाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.