Home / News / संभल मशीद वाद जैसे थे स्थिती राखा – सुप्रीम कोर्टाचे निर्देश

संभल मशीद वाद जैसे थे स्थिती राखा – सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Sambhal Mosque Dispute Maintain Status Quo – Supreme Court’s Directions

Sambhal Mosque Dispute Maintain Status Quo – Supreme Court’s Directions

नवी दिल्ली उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal mosque)येथील मशीद वाद प्रकरणी २५ ऑगस्टपर्यंत जैसे थे स्थिती (dispute)ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिले आहेत. न्या. ए. एस.चांदूरकर व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हिंदू पक्षाच्या वतीने सादर करण्यात आली होती. संभल मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले होते की, संभल मशीद ही धार्मिकस्थळे संरक्षण कायदा १९९१ च्या अंतर्गत येत नाहीत. मुस्लीम पक्षाच्या विधिज्ञ हजेफा अहमदी यांनी म्हटले की, धार्मिक स्थळे संरक्षण कायद्याखाली हे प्रकरण येत नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिकाही इतर याचिकांबरोबर सुनावणीसाठी घ्यावी का, अशी विचारणा केली. यावर हिंदू पक्षाच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी म्हटले की, ही वास्तू पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत संरक्षित असल्यामुळे ती धार्मिक स्थळे संरक्षण कायद्यामध्ये येणार नाही. या प्रकरणी याचिकाकर्त्यांना केवळ त्या मशिदीवर ताबा मिळवायचा आहे.