Home / देश-विदेश / हिंदू नावे वापरू नका! मुस्लीम बँडवाल्यांना तंबी

हिंदू नावे वापरू नका! मुस्लीम बँडवाल्यांना तंबी

लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेदरम्यान मुस्लीम दुकानदारांना स्वतःचे नाव फलकावर लिहिणे बंधनकारक केल्यानंतर मोरादाबाद शहरात आता मुस्लीम बँड पथकांना हिंदू...

By: E-Paper Navakal
Don't use Hindu names! Muslim bandits warned

लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेदरम्यान मुस्लीम दुकानदारांना स्वतःचे नाव फलकावर लिहिणे बंधनकारक केल्यानंतर मोरादाबाद शहरात आता मुस्लीम बँड पथकांना हिंदू नावे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोरादाबाद पोलिसांनी तशी सूचना या बँड पथकांना दिली आहे.
मोरादाबादमध्ये लहान-मोठी मिळून सुमारे 500 बँड पथके आहेत. त्यापैकी प्रख्यात असलेल्या किमान 20 बँड पथकांचे मालक मुस्लीम आहेत. या बँड पथक मालकांची नुकतीच मोरादाबाद पोलिसांनी बैठक घेऊन त्यांना बँड पथकांची हिंदू धर्मावरून असलेली नावे बदलण्याच्या सूचना दिल्या. यासंबंधी मोरादाबादमधील शावी सिंग या वकिलाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोर्टलवर तक्रार केली होती. त्यांचा असा दावा होता की मुस्लीम बँड पथकांची हिंदू नावे असल्यास त्यामुळे हिंदूंची फसवणूक होते. काही बँड पथकांची नावे शर्मा आणि अगरवाल आहेत. काही बँड पथकांची नावे हिंदू देव-देवतांवरून आहेत. त्यामुळे धार्मिक भावना दुखावतात. मुस्लीम बँड मालकांनी हिंदू नाव न वापरता आपली मुस्लीम अशी ओळख स्पष्ट होईल, अशी नावे वापरावीत.
यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना मोरादाबादचे पोलीस अधीक्षक कुमार रणविजय म्हणाले की, नावे बदलण्याचे आदेश देण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही केवळ दोन्ही धर्मांच्या बँड पथक मालकांना एकत्र बोलावून उभयमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
वकील शावी सिंग यांनी आपल्या तक्रारीचे समर्थन करत म्हटले की, हा धर्माचा मुद्दा नाही, तर फसवणुकीचा मुद्दा आहे. तर मुस्लीम बँड मालकांनी म्हटले की, आम्ही वीस वर्षांपासून हा व्यवसाय करत आहोत. आमच्या गुरुच्या नावावरून आम्ही बँडला ही नावे दिली आहेत. आता आम्ही आधीच काही कार्यक्रमांची बुकिंग घेतली आहेत. त्यामुळे नाव बदलायला पोलिसांकडे थोडी मुदत मागितली आहे. यापुढील सगळी बुकिंग नव्या नावाने घेतली जातील.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या