Home / देश-विदेश / 5 वर्षांनंतर TikTok ची भारतात होणार एन्ट्री? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

5 वर्षांनंतर TikTok ची भारतात होणार एन्ट्री? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

TikTok Ban India

TikTok Ban India: लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म TikTok भारतात परतणार अशा चर्चांना उधाण आले आहे. टिकटॉकची (TikTok Ban India) वेबसाइट भारतात पाहता येत असल्याचे अनेक यूजर्सने म्हटले होते. मात्र, आता या चर्चांवर भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारने सांगितले आहे की, टिकटॉकवरील बंदी (TikTok Ban India) उठवण्याबाबत कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, टिकटॉकवरील बंदी उठवण्याबाबतची कोणतीही बातमी किंवा विधान चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.

काही सोशल मीडिया यूजर्सने 5 वर्षात पहिल्यांचा टिकटॉकची वेबसाइट भारतात पाहता येत असल्याचे म्हटले होते. मात्र, टिकटॉक अॅप अद्याप भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध नाही. सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर सरकारने ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.

टिकटॉकवर बंदी (TikTok Ban India) का घालण्यात आली होती?

जून 2020 मध्ये भारत सरकारने 59 ॲप्सवर बंदी घातली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हा निर्णय घेतला होता. या ॲप्समुळे भारताची सार्वभौमता आणि अखंडता, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना धोका निर्माण होत असल्याचे सरकारने सांगितले होते.

या ॲप्सच्या यादीत टिकटॉकसह Shareit, Kwai, UC Browser, UC News, Vigo Video, Baidu map आणि Clash of Kings यांसारख्या ॲप्सचा समावेश होता.

भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा

गेल्याकाही दिवसात भारत आणि चीन (India and China) यांच्या संबंधांमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. नुकतेच चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी भारताला भेट दिली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या करांविरोधात (tariffs) भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. भारतातील प्रमुख नेत्यांनीही चीनचा दौरा केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळताना दिसत आहे.


हे देखील वाचा –

‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण

‘आधार कार्ड’चा पुरावा ग्राह्य धरावा’, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना मोठा दिलासा

जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त