PAN Card Online Download Process: आजच्या काळात PAN Card हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज (बनले आहे. आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्यापासून ते बँक खाते उघडणे, कर्ज घेणे आणि विविध आर्थिक व्यवहारांसाठी त्याची आवश्यकता असते.
अशा वेळी जर तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले, तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुमचेही पॅन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही NSDL आणि UTIITSL या अधिकृत वेबसाइट्सवरून पॅन कार्ड डाऊनलोड (PAN Card Online Download Process) करू शकता.
NSDL वरून पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया (PAN Card Online Download Process)
- स्टेप 1: सर्वात आधी NSDL च्या https://www.onlineservices.nsdl.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
- स्टेप 2: होमपेजवर “Reprint PAN Card” किंवा “Download e-PAN” पर्याय निवडा.
- स्टेप 3: तुमचा पॅन नंबर, आधार नंबरआणि जन्म तारीखयासारखी माहिती भरा.
- स्टेप 4: कॅप्चा कोड टाकून “Submit” करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येईल.
- स्टेप 5: ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर, सुमारे 50 ते 101 रुपयांपर्यंतचे शुल्क भरा. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमच्या ईमेलवर e-PAN PDF स्वरूपात मिळेल.
UTIITSL वरून डुप्लिकेट पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- स्टेप 1: UTIITSL च्या https://www.utiitsl.com या अधिकृत साइटवर जा.
- स्टेप 2: “PAN Card Services” वर क्लिक करून “Reprint PAN Card” पर्याय निवडा.
- स्टेप 3: पॅन नंबर, जन्म तारीख आणि आधार नंबर टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीद्वारे पुढे जा.
- स्टेप 4: सुमारे 50 ते 101 रुपयांपर्यंतचे शुल्क भरा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच e-PAN डाउनलोड करता येईल आणि सोबतच फिजिकल पॅन कार्डही तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. हे कार्ड येण्यासाठी 7 ते 15 दिवस लागू शकतात.
शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे
- e-PAN (PDF फॉरमॅट): शुल्क 50 रुपये (GST सह) आहे. हे तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर त्वरित पाठवले जाते.
- फिजिकल PAN Card (हार्ड कॉपी): शुल्क 101 रुपये (GST आणि पोस्टल चार्जेससह) आहे. हे तुमच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवले जाते.
डुप्लिकेट पॅन कार्डसाठी तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर, जन्म तारीख, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पेमेंटसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI आवश्यक आहे.
हे देखील वाचा –
भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक
जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त