Home / देश-विदेश / गोवा पर्यटकांच्या बाबतीत देशात १२ व्या स्थानावर ! विदेशी पर्यटकांबाबत महाराष्ट्र नंबर १ वर

गोवा पर्यटकांच्या बाबतीत देशात १२ व्या स्थानावर ! विदेशी पर्यटकांबाबत महाराष्ट्र नंबर १ वर

Goa Named The 12th BEST Destination In The World

पणजी – देशविदेशातील सर्वाधिक पर्यटक (tourists)येणार्‍या राज्यांच्या यादीत यंदा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे.तर पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीच्या गोवा राज्याला मात्र १२ व्या स्थानावर (12th place)समाधान मानावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांतील पर्यटकांच्या संख्येची ही यादी आहे.उत्तर प्रदेश पाठोपाठ राजस्थान (Rajasthan)दुसर्‍या क्रमांकावर आहे. केवळ विदेशी पर्यटकांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

गेल्या दोन वर्षांत बिहार आणि पश्चिम ही राज्येसुद्धा पर्यटकांच्या बाबतीत गोव्याच्या पुढे आहेत.गोवा राज्यात २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत १.९० कोटी पर्यटक (Goa recorded 1.90 crore tourists,)आले.यामध्ये १.८१ कोटी देशी तर ९.२० लाख विदेशी पर्यटकांचा समावेश होता.२०२३ साली ८१.७५ लाख देशी आणि ४.५२ लाख विदेशी पर्यटक आले होते,तर २०२४ साली
९९.४१ लाख देशी (99.41 lakh domestic) आणि ४.६७ लाख विदेशी पर्यटक (4.67 lakh foreign tourists.)आले.या दोन्ही वर्षांचे मिळून एकूण १.९० कोटी पर्यटकांसह गोवा १२व्या स्थानावर आहे.

विदेशी पर्यटकांच्या बाबतीत महाराष्ट्र ७० लाख पर्यटकांसह (70 lakh visitors,)पहिल्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे दिल्ली (Delhi) सहाव्या स्थानावर, तामिळनाडू (Tamil Nadu)सातव्या, केरळ आठव्या, बिहार (Bihar) नवव्या,पंजाब दहाव्या, कर्नाटक (Karnataka)अकराव्या आणि गोवा १२व्या स्थानावर आहे.उत्तर प्रदेश हे राज्य ११२ कोटी देशी आणि विदेशी पर्यटक मिळून पहिल्या स्थानांवर आहे. ४१.२९ कोटी पर्यटकांसह राजस्थान दुसऱ्या स्थानावर,३६.७१ कोटी पर्यटकांसह गुजरात (Gujarat)तिसऱ्या स्थानावर, ३५.७८ कोटी पर्यटकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आणि ३५.५९ कोटी पर्यटकांसह पश्चिम बंगाल (West Bengal)पाचव्या स्थानावर आहे.