Home / लेख / तुमच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल चांगले आहे? जाणून घ्या

तुमच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल चांगले आहे? जाणून घ्या

Best Cooking Oil For Health

Best Cooking Oil For Health: भारतात मधुमेहासोबत लठ्ठपणा (obesity) देखील गंभीर समस्ये बनत चालला आहे. स्पर्धेच्या काळात तरूणांकडून आरोग्याकडे लक्ष न दिल्याने अनेक आजारांची लागण होत असल्याचे दिसून येते. पंतप्रधान मोदींनी देखील काही दिवसांपूर्वी याबाबत चिंता व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाचा उल्लेख करतानाच त्यांनी प्रत्येक कुटुंबाला स्वयंपाकघरातील तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल चांगले आहे, त्याबाबत जाणून घेऊया.

स्वयंपाकघरातील तेल (Best Cooking Oil For Health)

काही तेल आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. उदा. पाम तेल (palm oil). यात ओमेगा-6 आणि ओमेगा-3 चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात अंतर्गत सूज वाढते आणि वजन वाढू लागते.

त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करणे आवश्यक आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त तेल

काही तेल शरीरासाठी आवश्यक ‘गुड फॅट्स’ म्हणून काम करतात. यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.

  • मोहरीचे तेल: भाजी शिजवण्यासाठी वापरू शकता.
  • देसी तूप : डाळ किंवा पोळीवर लावून खाऊ शकता, पण जास्त गरम करू नये.
  • ऑलिव्ह ऑइल : याचा वापर कच्च्या स्वरूपात (उदा. सॅलडवर) करणे फायदेशीर आहे.

किती तेल वापरणे योग्य आहे?

एका व्यक्तीसाठी दिवसभरात 20-40 ग्रॅम, म्हणजेच 2-3 चमचे तेल पुरेसे आहे. यात जेवण बनवण्यासाठी वापरलेले आणि वरून घेतलेले तेल दोन्हीचा समावेश आहे. वजन कमी करायचे असल्यास, यापेक्षा कमी तेल वापरणे योग्य आहे.

लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यासाठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

  • आहार: भूक लागल्यावरच खा, जास्त खाऊ नका. आहारात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवा, तर कार्बोहायड्रेट आणि साखर कमी करा.
  • व्यायाम: आठवड्यातून 4-5 दिवस व्यायाम करणे, 30-40 मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा योग करणे आवश्यक आहे.
  • झोप: शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी 7-8 तास झोप घेणे महत्त्वाचे आहे.

हे देखील वाचा –

सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे

PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक