Google Pixel 9 Pro: गुगलने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 10 Pro लाँच केला आहे. हा फोन लाँच होताच कंपनीने Google Pixel 9 Pro (गुगल पिक्सेल 9 प्रो) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
लाँचच्या किमतीपेक्षा हा स्मार्टफोन तब्बल 23,000 रुपये स्वस्त मिळत आहे. या फोनविषयी सविस्तर जाणून घ्या.
Google Pixel 9 Pro ची किंमत आणि ऑफर्स
- किंमत: Google Pixel 9 Pro चा 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट Flipkart वर 89,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हा फोन 1,09,999रुपये किमतीत लाँच झाला होता.
- बँक ऑफर: HDFC बँकच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास3,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. अशाप्रकारे फोनची किंमत अजून कमी होईल.
- एक्सचेंज ऑफर: या फोनवर 55,850 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ जुन्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
Google Pixel 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: यात 6.3 इंचाचा सुपर ॲक्चुओ LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1280 x 2856 पिक्सल आहे. यात 3000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट मिळतो. सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 देण्यात आले आहे.
- प्रोसेसर: हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो आणि यात Tensor G4 चिपसेट आहे, ज्यामुळे परफॉर्मन्स उत्तम मिळतो.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात रियरला 50 मेगापिक्सल वाइड कॅमेरा, 48 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 30x सुपर रेस झूमसह 48 मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 42 मेगापिक्सलचा ड्यूल पीडी फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: यात 4,700mAh ची बॅटरी आहे, जी 45W च्या वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग सह येतो.
हे देखील वाचा –
9 कॅरेट सोने म्हणजे काय? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
OpenAI सोबत काम करण्याची संधी, कंपनीने भारतात ‘या’ 3 पदांसाठी सुरू केली कर्मचारी भरती
सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे