Home / arthmitra / सिबिल स्कोअरशिवाय कर्ज मिळेल का? सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती

सिबिल स्कोअरशिवाय कर्ज मिळेल का? सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती

CIBIL Score

CIBIL Score: सध्या कर्ज घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर (CIBIL Score) असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, सिबिल स्कोअर आणि कर्जासंबंधी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. याबद्दल अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) नुकतीच संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सिबिल स्कोअरची गरज आणि बँका त्याचा कसा वापर करतात, यावर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, सिबिल ही एक क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अशा चार कंपन्यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये ट्रान्सयुनियन सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपेरियन आणि सीआरआयएफ हाय मार्क यांचा समावेश आहे.

सिबिल स्कोअर (CIBIL Score) महत्त्वाचा का असतो?

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने बँकांना कर्जदाराची पत तपासणी करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून माहिती घेण्यास सांगितले आहे, आणि यामध्ये सिबिलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

कर्जदाराचा पूर्वीचा कर्जाचा इतिहास, परतफेडीची माहिती, थकीत कर्ज किंवा इतर तपशील कर्ज देण्यासाठी आवश्यक असतो. सिबिल स्कोअरमुळे कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता तपासता येते, ज्यामुळे बँकांना योग्य निर्णय घेणे सोपे जाते.

सिबिल स्कोअरशिवाय (CIBIL Score) कर्ज मिळेल का?

आरबीआयने कोणत्याही कर्जासाठी किमान सिबिल स्कोअर अनिवार्य केलेला नाही. बँक आपल्या धोरणांनुसार आणि व्यावसायिक विचारांनुसार निर्णय घेते. पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, कर्ज देताना सिबिल स्कोअर हा अनेक इनपुटपैकी एक असतो, तोच एकमेव निकष नसतो.

विशेषतः, ज्यांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे किंवा ज्यांचा कोणताही क्रेडिट इतिहास नाही, अशा लोकांचा अर्ज केवळ क्रेडिट हिस्ट्री नसल्यामुळे नाकारला जाऊ नये, असे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण

सिबिलने गोळा केलेल्या डेटाचा गैरवापर होतो अशा तक्रारींवर उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, आरबीआयने तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. आता प्रत्येक सिबिल कंपनीमध्ये ‘आंतरिक लोकपाल’ असतो. त

सेच, ग्राहकांना वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार आहे. जेव्हा बँक एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते, तेव्हा त्याबद्दलची माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे ग्राहकाला देणे बंधनकारक आहे.


हे देखील वाचा –

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप

मंदिरांतील राजकारणावर केरळ हायकोर्टाची बंदी