Dog Controversy: राजस्थानातील (Rajasthan news) झुनझुनु येथे तब्बल २५ श्वानांची हत्या (Dog Controversy) करणाऱ्या आरोपीची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या गावात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतासाठी गावात डीजे (DJ) लावण्यात आला. त्याला फुलांच्या माळा घालण्यात आल्या. त्याचचप्रमाणे त्याची गावातून मिरवणूकही काढण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही चांगलेच व्हायरल झाले आहेत.
गुजरातमध्ये बलात्काराची शिक्षा भोगून आलेल्या ओरापींचे ज्या प्रमाणे स्वागत करण्यात आले होते. तशाच प्रकारची घटना राजस्थानात घडली आहे. झुनझुनु तालुक्यातील कुमावास या गावाचा श्योचंद बावारीया याने २ ऑगस्ट रोजी गावातील २५ कुत्रे मारले होते. त्यावेळी या घटनेचे व्हिडिओही गाजले होते.
त्यावर जवळच्या एका गावातील माजी सरपंच सरोज झांजीझाडीया याने तक्रार दाखल केली होती. त्यावर बावरीला अटक केली होती. त्याची काल जामीनावर सुटका झाल्यानंतर त्याचे त्याच्या गावात जोरदार स्वागत करण्यात आले. या व्हिडीयोवर काही प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. अशा पद्धतीने गुन्हेगारांचे उदात्तीकरण चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अशा प्रकारे गुन्हेगाराचे स्वागत करणे व त्याला मान देणे हे समाजासाठी धोकादायक आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की आपण जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांना भेटून त्यांच्याकडे या उदात्तीकरणाविरोधात तक्रार करणार आहे.
हे देखील वाचा-
10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप
‘हनुमान हेच अंतराळात प्रवास करणारे पहिले व्यक्ती’; भाजप नेते अनुराग ठाकूर यांचे विधान चर्चेत