Home / News / विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला

विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला

Rain Intensifies Again Across the State

After a Pause, Rain Intensifies Again Across the State


Rain Intensifies Again Across the State राज्यात मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे (heavy rainfall)अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने (IMD)दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि मध्य प्रदेशात (Bay of Bengal and Madhya Pradesh)तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आगामी दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये ऑरेंज(Orange Aler) आणि येलो अलर्ट(Yellow alerts) जारी केला आहे.यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली भागात ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळीच मुंबईत(mumabi rain ) जोरदार पावसाने हजेरी लावून मुंबईकरांची तारांबळ उडवली. सायनमधील गांधी मार्केट परिसर आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे पाणी साचले होते.विलेपार्ले विमानतळाजवळील वाहतूक बाधित झाली होती.यासंदर्भात विमान कंपन्यांनी प्रवाशांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. दरम्यान मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीत सुरु होती.
दरम्यान सातपुडा(satpuda) परिसरात मुसळधार पावसामुळे निसारा नदीला पूर आल्याने पुलावर बोलेरो कार पुरात अडकली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रयत्न करून पूरात अडकलेले वाहन बाहेर काढले. तर स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा इशारा देऊन नागरिकांनी नदी, ओढे,पूल ओलांडताना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली आहे. या पर्वतरांगांमध्ये झालेल्या पावसामुळे वान धरण ८३.६५ टक्के भरले.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचे दोन दरवाजे उघडून ७३.८६ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला. संग्रामपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढून ४१.४२ टक्के झाले तर जळगाव जामोद तालुक्यात ५२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.


हे देखील वाचा –

सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला

बीसीसीआय-ड्रीम ११ फारकत ! ३५८ कोटींचा करार मोडला