Indian Motorcycle Scout Series: प्रीमियम मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रसिद्ध असलेल्या इंडियन मोटरसायकलने (Indian Motorcycle) त्यांच्या अनेक मॉडेल्सना अपडेट करून 2025 साठी बाजारात आणले आहे. (Indian Motorcycle Scout Series)
या अपडेटेड स्काउट सीरिज मध्ये एकूण 8 मॉडेल्सचा समावेश आहे, ज्यात नवीन इंजिन, दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे.
Indian Motorcycle Scout Series: या मॉडेल्सना मिळाले अपडेट
कंपनीने लाँच केलेल्या 8 मॉडेल्समध्ये Scout Sixty Bobber, Sport Scout Sixty, Scout Sixty Limited, Scout Bobber, Scout Classic, Sport Scout, 101 Scout आणि Super Scout यांचा समावेश आहे. प्रत्येक मॉडेलमध्ये काही विशिष्ट बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हे सर्व मॉडेल्स अधिक आकर्षक आणि शक्तिशाली बनले आहेत.
Indian Motorcycle Scout Series: दमदार इंजिन आणि फीचर्स
या नवीन मॉडेल्समध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. काही मॉडेल्समध्ये 999 सीसी क्षमतेचे ‘स्पीड प्लस’ इंजिन दिले आहे, जे 85 हॉर्स पॉवर आणि 87 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. तर, काही मॉडेल्सना 1250 सीसी क्षमतेचे अधिक शक्तिशाली ‘स्पीड प्लस’ इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही इंजिनांसोबत 5-स्पीड ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.
नवीन फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एबीएस, एलईडी लाइट्स, ॲनालॉग स्पीडोमीटर, यूएसबी चार्जर, रायडिंग मोड्स, 16-इंच व्हील्स, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि यूएसडी फॉर्क्ससारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
Indian Motorcycle Scout Series: किंमत आणि उपलब्धता
इंडियन मोटरसायकलच्या या नवीन अपडेटेड मॉडेल्सची किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 16.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
मॉडेल्सच्या किंमती (एक्स-शोरूम):
- Scout Sixty Bobber – 12.99 लाख रुपये
- Sport Scout Sixty – 13.28 लाख रुपये
- Scout Sixty Limited – 13.42 लाख रुपये
- Scout Bobber – 13.99 लाख रुपये
- Scout Classic – 14.02 लाख रुपये
- Sport Scout – 14.09 लाख रुपये
- 101 Scout – 15.99 लाख रुपये
- Super Scout – 16.15 लाख रुपये
हे अपडेटेड मॉडेल्स आता बाजारात उपलब्ध झाले असून, लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसतील.
हे देखील वाचा-
“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा
मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला