Home / देश-विदेश / महादेवी हत्ती प्रकरणानंतर ‘वनतारा’च्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

महादेवी हत्ती प्रकरणानंतर ‘वनतारा’च्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Supreme Court Vantara SIT

Supreme Court Vantara SIT: गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्सच्या वनतारा (Supreme Court Vantara SIT) ग्रीन झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ‘विशेष तपास पथक’ (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील ‘महादेवी’ हत्तीच्या प्रकरणानंतर वनतारावर प्राणी संपादन, त्यांच्यावर उपचार आणि आर्थिक व्यवहारांवर अनेक आरोप झाले होते. याच आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.

न्यायालयाचा निर्णय

रिपोर्टनुसार, सर्वोच्च न्यायालयाने वनतारावर भारत आणि परदेशातील प्राणी संपादन करण्याच्या पद्धती, प्राण्यांवरील उपचार आणि आर्थिक व्यवहारांसंबंधीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या आरोपांमध्ये ‘केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण’ आणि ‘साइट्स’ (CITES) यांसारख्या वैधानिक संस्थांचाही समावेश असल्याने, सत्यता तपासण्यासाठी एका स्वतंत्र समितीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या एसआयटीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर करणार आहेत. त्यांच्यासोबत उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि ‘इंडियन रेव्हेन्यू सर्विस’ अधिकारी अनीश गुप्ता यांचाही समावेश असणार आहे.

वनताराची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर वनतारा केंद्राने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अत्यंत आदर करतो. वनतारा पारदर्शकता, प्राण्यांप्रती दया आणि कायद्याचे पूर्ण पालन करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट प्राण्यांची सुटका, पुनर्वसन आणि त्यांची काळजी घेणे हेच आहे.”

वनताराने एसआयटीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्ही विशेष तपास पथकाला पूर्ण सहकार्य करू आणि आमचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवू. आम्ही ज्या प्राण्यांची सेवा करतो, त्यांचे कल्याण नेहमीच आमच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहील,” असेही निवेदनात म्हटले आहे.


👉 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा

मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला

Share:

More Posts