Home / लेख / पंतप्रधान मोदींच्या हस्ते Maruti Suzuki e-Vitara लाँच, 100 देशात होणार निर्यात; जाणून घ्या किंमत-फीचर्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते Maruti Suzuki e-Vitara लाँच, 100 देशात होणार निर्यात; जाणून घ्या किंमत-फीचर्स

Maruti Suzuki e-Vitara

Maruti Suzuki e-Vitara: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरातमधील सुझुकी मोटर (Suzuki Motor) प्लांटमध्ये दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki e-Vitara) पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘ई-विटारा’ (e-Vitara) च्या पहिल्या युनिटला हिरवा झेंडा दाखवून त्याचे उत्पादन सुरू करण्यात आले.

यानंतर, त्यांनी हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्स तयार करणाऱ्या पहिल्या प्लांटचेही उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि जपानचे राजदूत केईची ओनो उपस्थित होते.

Maruti Suzuki e-Vitara: भारतातून 100 देशांमध्ये निर्यात

या प्लांटच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी माहिती दिली की, ‘भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे.’ या प्लांटमध्ये तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या जगभरातील 100 देशांमध्ये निर्यात केल्या जाणार आहेत.

ई-विटाराचे पहिले युनिट यूकेमध्ये (UK) निर्यात केले जाईल. हे मॉडेल गेल्या वर्षी युरोपमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले होते आणि 2025 च्या ‘भारत मोबिलिटी शो’मध्येही ते दाखवण्यात आले होते.

Maruti Suzuki e-Vitara: खास फीचर्स

मारुती सुझुकीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 40PL नावाच्या खास ईव्हीप्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, जो टोयोटाच्या (Toyota) सहकार्याने बनवला गेला आहे. या प्लॅटफॉर्मवर टोयोटाची ‘अर्बन क्रूझर ईव्ही’ देखील तयार केली जाईल.

ई-विटारामध्ये दोन बॅटरीचे पर्याय उपलब्ध असतील: 49 kWh आणि 61 kWh. मोठ्या बॅटरीसह डुअल-मोटर AWD (AllGrip-e) पर्याय देखील मिळेल. ही गाडी लवकरच अधिकृतरित्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उफलब्ध होईल.

या इलेक्ट्रिक एसयूव्हीची अंदाजित एक्स-शोरूम किंमत सुमारे 20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. बाजारात आल्यानंतर ती महिंद्रा बीई6 , ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, एमजी झेडएस ईव्ही अशा गाड्यांशी स्पर्धा करेल.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

जो रूट मोडणार सचिनचा मोठा विक्रम? मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘मी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच…’

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा