New Rules From 1 September: येत्या 1 सप्टेंबरपासून तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात. तुम्ही चांदी खरेदी करत असाल, SBI कार्ड वापरत असाल किंवा घरगुती गॅस सिलेंडर घेत असाल तर या नियमांचा तुमच्या परिणाम होऊ शकतो.
हे नवे नियम (New Rules From 1 September) काय आहेत आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घेऊया.
चांदीच्या खरेदी-विक्रीचे नवे नियम
सरकार चांदीसाठी नवीन नियम आणत आहे. यानुसार, चांदीच्या खरेदी-विक्रीमध्ये अधिक पारदर्शकता येईल. लवकरच चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे चांदीच्या किमती आणि गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू होऊ शकतात.
SBI क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
1 सप्टेंबरपासून SBI क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलत आहेत. क्रेडिट कार्डने बिल पेमेंट, इंधन खरेदी किंवा ऑनलाइन शॉपिंगवर आता अधिक शुल्क लागू शकतो. ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2% दंड लागेल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यासोबतच, रिवॉर्ड पॉइंट्सचे मूल्यही कमी होण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस सिलेंडर आणि एटीएमचे नियम
LPG सिलेंडरच्या ) किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. 1 सप्टेंबर रोजीही किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात. हे बदल तेल कंपन्या आणि जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात. किमती वाढल्यास तुमच्या स्वयंपाकघराचे बजेट (budget) थोडे बिघडू शकते.
याव्यतिरिक्त, काही बँकांमध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतात. एटीएम व्यवहारांवर नवीन शुल्क लागू शकतात, खासकरून जर तुम्ही ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास. म्हणून, अनावश्यक एटीएम वापरणे टाळा आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा.
बँक FD च्या दरांमध्ये बदल
यासोबतच, काही बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या व्याज दरातही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश बँका 6.5% ते 7.5% व्याज देत आहेत, पण हे दर कमी होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर लवकर निर्णय घ्या.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
कामाच्या वेळेत बदल, ओव्हरटाइम वाढणार; महाराष्ट्र सरकारचा खासगी कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव
हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या