Home / लेख / भारतात लाँच झाली हटके ‘NEO HiRANGE’ इलेक्ट्रिक रिक्षा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

भारतात लाँच झाली हटके ‘NEO HiRANGE’ इलेक्ट्रिक रिक्षा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

NEO HiRANGE EV Auto-rickshaw

NEO HiRANGE EV Auto-rickshaw: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी युलर मोटर्सने (Euler Motors) व्यावसायिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आहे. यासाठी कंपनीने ‘NEO by Euler’ हा नवीन ब्रँड लाँच केला असून, या ब्रँडअंतर्गत पहिले उत्पादन म्हणून ‘NEO HiRANGE’ ही इलेक्ट्रिक तीन-चाकी गाडी (NEO HiRANGE EV Auto-rickshaw) बाजारात आणली आहे.

‘NEO HiRANGE’ या इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षाची किंमत 3,09,999 रुपये आहे. ही ऑटो-रिक्षा शहरी भागातील चालकांसाठी अधिक रेंज, टिकाऊपणा आणि कमी ऑपरेटिंग खर्चासह डिझाइन करण्यात आली आहे.

‘NEO HiRANGE’ ची खास वैशिष्ट्ये

युलर मोटर्सने 10,000 हून अधिक रिक्षाचालकांकडून मिळालेल्या माहिती आणि 2 वर्षांच्या संशोधनानंतर हे वाहन तयार केले आहे. भारतीय रस्त्यांसाठी योग्य असलेले हे वाहन लांब पल्ल्याचे प्रवास आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देईल, असा कंपनीचा दावा आहे.

बॅटरी आणि रेंज: ‘NEO HiRANGE’ तीन वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे: HiRANGE, PLUS आणि MAXX. यांची रिअल-वर्ल्ड रेंज अनुक्रमे 130+ किमी, 170+ किमी आणि 200+ किमी आहे. MAXX व्हेरियंट केवळ 3.25 तासांत पूर्ण चार्ज होतो.

इतर वैशिष्ट्ये: यात 9 kW मोटर, 65 Nm टॉर्क, हिल-असिस्ट, रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स, GPS-आधारित अँटी-थेफ्ट सिस्टीम आणि 6 वर्षांची/1.75 लाख किमीपर्यंतची वॉरंटी दिली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कामाच्या वेळेत बदल, ओव्हरटाइम वाढणार; महाराष्ट्र सरकारचा खासगी कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव

हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या

‘… म्हणून अमित शाह पुढील 50 वर्ष सत्तेत राहण्याचा दावा करतात’; ‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींची जोरदार टीका