Home / लेख / गणेशोत्सवाचा इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा कशी बनली महाराष्ट्राचा अभिमान? जाणून घ्या

गणेशोत्सवाचा इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा कशी बनली महाराष्ट्राचा अभिमान? जाणून घ्या

Ganeshotsav History in Marathi

Ganeshotsav History in Marathi: महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचे आगमन झाले आहे. आता पुढील 10 दिवस राज्यात या सणाचा उत्साह पाहायला मिळेल. आज गणेशोत्सवाची परंपरा ही महाराष्ट्राचा अभिमान झाली आहे. पण या उत्सवाचा इतिहास जवळपास 100 वर्ष जूना आहे.

इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव हे स्वातंत्र्य चळवळीचे एक शक्तिशाली माध्यम बनवले होते. आता तीच परंपरा महाराष्ट्रात सर्वात मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात बदलली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनी सुरू केलेली परंपरा (Ganeshotsav History in Marathi)

गणेशोत्सवाचे मूळ ब्रिटिश काळाच्याही खूप आधीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या काळात पुण्यात हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जात असल्याचे ऐतिहासिक नोंदी सांगतात. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्धच्या लढाईत आपल्या प्रजेमध्ये एकता निर्माण करण्यासाठी गणपतीची पूजा करण्यास प्रोत्साहन दिले.

शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी या उत्सवाला आणखी महत्त्व दिले. गणपती हे त्यांचे कुलदैवत होते, त्यामुळे त्यांनी पुण्यात भव्य सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन दिले.

ब्रिटिशांनी उत्सवांवर लादली बंदी

19 व्या शतकात ब्रिटिश राजवटीच्या आगमनानंतर सार्वजनिक उत्सवांची भव्यता कमी झाली. 1818 ला मराठे साम्राज्य लयाला गेल्यानंतर हिंदू सणांना मिळणारे राजाश्रय बंद केले. मोठ्या जमावांना राजद्रोहाचे कारण मानून ब्रिटिशांनी 1892 मध्ये 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली. त्यामुळे गणेशोत्सव केवळ घरापुरता मर्यादित झाला.

लोकमान्य टिळकांनी दिला उत्सवाला नवा आयाम

1890 च्या दशकात, वाढत्या जातीय तणावाच्या काळात टिळकांनी गणेशोत्सवाचा उपयोग लोकांना एकत्र आणण्यासाठी केला. ब्रिटिश कायद्यातील धार्मिक कार्यक्रमांच्या सूटचा वापर करून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे ठरवले. 1893 मध्ये, पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिकरित्या गणपतीची मूर्ती बसवली. टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात त्यांचे कौतुक केले आणि स्वतःच्या ‘केसरीवाडा’ निवासस्थानी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले.

या 10 दिवसांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादावर व्याख्याने, देशभक्तीपर गाणी आणि तरुणांसाठी शारीरिक कवायतींचे आयोजन केले गेले. ‘केसरी’च्या वृत्तानुसार, 1893 च्या या उत्सवाने ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा सर्व समाजाला एकत्र आणले.

टिळकांच्या या प्रयत्नांमुळे गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. सार्वजनिक मंडपांची सुरुवात झाली, सामुदायिक मेजवान्या आणि सामूहिक विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या, ज्यातून एकत्र राहण्याचा आणि एकजुटीचा संदेश दिला गेला.

आज गणेशोत्सव महाराष्ट्राचा अभिमान

टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आज महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव बनला आहे. पुण्यातील मानाच्या गणपतीपासून ते मुंबईचा ‘लालबागचा राजा’पर्यंत… गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा

1 सप्टेंबरपासून लागू होणार 5 मोठे बदल; तुमच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता

कामाच्या वेळेत बदल, ओव्हरटाइम वाढणार; महाराष्ट्र सरकारचा खासगी कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव