Home / महाराष्ट्र / मुंबई ते कोकण प्रवास होणार जलद, थेट बोटीने जाता येणार; जाणून घ्या Ro-Ro फेरी सेवेचे तिकीट दर

मुंबई ते कोकण प्रवास होणार जलद, थेट बोटीने जाता येणार; जाणून घ्या Ro-Ro फेरी सेवेचे तिकीट दर

Mumbai Konkan Ro-Ro Ferry: मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रो-रो (Ro-Ro) फेरी...

By: Team Navakal
Mumbai Konkan Ro-Ro Ferry

Mumbai Konkan Ro-Ro Ferry: मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रो-रो (Ro-Ro) फेरी सेवेला हिरवा कंदील दिला आहे. मुंबईला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमार्गे कोकणला (Konkan) जोडणारा हा प्रकल्प 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे.

रो-रो फेरी सेवा ही एक अशी जलवाहतूक आहे, जिथे प्रवासी थेट त्यांच्या वाहनांसह जहाजावर जाऊ शकतात, प्रवास करू शकतात यामुळे रस्त्यावरील गर्दी आणि इंधनाचा खर्च तर कमी होतोच, पण वेळेचीही बचत होते.

या सेवेमुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि गर्दीच्या रेल्वे मार्गांचा वापर टाळता येईल. 1 सप्टेंबरपासून या मार्गावर व्यावसायिक सेवा सुरू करणार आहोत.

या बोटीचे नाव ‘M2M प्रिन्सेस’ असे आहे, जी आशियातील सर्वात आधुनिक आणि वेगवान बोट आहे.

मुंबई-कोकण प्रवासाला किती वेळ लागेल?

या सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरीमधील जयगडपर्यंतचा प्रवास केवळ 3-4 तासांत पूर्ण होईल. तसेच, मुंबई ते सिंधुदुर्गमधील विजयदुर्गपर्यंतचा प्रवास 5-6 तासांत पूर्ण होऊ शकतो. ही फेरी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून सकाळी 6:30 वाजता निघेल आणि विजयदुर्गला पोहोचल्यानंतर दोन तासांनी परतीचा प्रवास सुरू करेल.

Ro-Ro फेरी सेवेचे तिकीट दर

लवकरच सुरू होणाऱ्या या फेरी सेवेमध्ये 50 चारचाकी वाहने, 30 दुचाकी आणि अनेक मिनीबस नेण्याची क्षमता आहे. अहवालानुसार, तिकीट दर खालीलप्रमाणे आहेत:

  • इकॉनॉमी क्लास (552 सीट): 2,500 रुपये
  • प्रीमियम इकॉनॉमी क्लास (44 सीट): 4,000 रुपये
  • बिझनेस क्लास (48 सीट): 7,500 रुपये
  • फर्स्ट क्लास (12 सीट): 9,000 रुपये
  • कार: 6,000 रुपये
  • दुचाकी: 1,000 रुपये
  • सायकल: 600 रुपये
  • मिनीबस: 13,000 रुपये
  • 30-सीटर बस: 14,500 रुपये
  • 45-सीटर बस: 17,000 रुपये
  • 45 पेक्षा जास्त सीट असलेल्या बस: 21,000 रुपये

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मायकेल क्लार्कपासून युवराज सिंगपर्यंत, ‘या’ क्रिकेटपटूंनी मैदानाबाहेर कॅन्सरशी दिला लढा

PM SVANidhi Yojana: आता 50,000 रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या